नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशामध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये मागील काही दिवसापासून सतत दोन-तीन दिवसाआड काही पैशांनी वाढ होतेय. आज पेट्रोलच्या दरात 7 पैसे तर डिझेलच्या दरामध्ये 9 पैशांनी वाढ झाली आहे. दरम्यान, या दरवाढीमुळे मुंबईतील पेट्रोलचा दर 78.59 प्रति लीटर आणि डिझेलचा दर 69.65 रुपयांवर पोहोचलाय.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती या आंतराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींवर अवलंबून असतात. भारत गरजेच्या 80 टक्के तेल आयात करतो. गुरुवारी रुपयाचे डॉलरच्या तुलनेत मुल्य 70.04 रुपये होते. बुधवारपेक्षा 16 पैशांनी रुपया घसरला. तसेच अमेरिकेने ओपेक देश आणि इराणवर निर्बंध लादल्याने आंतराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे.