फैजपूर येथे “व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा” उत्साहात

dhananji clg

 

फैजपूर प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, विद्यार्थी विकास विभाग आणि धनाजी नाना महाविद्यालयातील युवती सभा यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय विद्यार्थींसाठी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.

अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ.पी.आर चौधरी होते. कार्यशाळेचे उद्घाटन प्रा.डॉ.गौरी राणे यांच्याहस्ते करण्यात आले. प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांनी विद्यार्थिनींना निर्णयक्षमता, आत्मविश्‍वास, मनोबल आणि स्वयंप्रेरणा वाढवण्यावर भर देण्यास सांगितले. विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.जी.जी.कोल्हे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवती सभा प्रमुख प्रा.डॉ.सविता वाघमारे यांनी केले.

प्रथम सत्रामध्ये प्रा.डॉ.गौरी राणे, मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव यांनी गृह कर्तव्यदक्षता आणि सामाजिक जीवनातील समन्वय या विषयावर विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन कसे करावे त्याचबरोबर, समायोजन केसे साधावे, एकमेकींना मदत कशी करायची, यावर प्रकाश टाकला. विचारांची देवाण-घेवाण झाली पाहिजे. त्याबरोबरच स्वयंशिस्त असली पाहिजे. त्याचबरोबर कर्तव्यतत्परता अंगी बाळगली पाहिजे. इत्यादी अनेक गोष्टी मुलींना समजून संगितल्या.

दुसऱ्या सत्रामध्ये कविता दातार, जळगाव यांनी सायबर क्राईम आणि महिला सुरक्षा या विषयावर अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्टी विद्यार्थिनिना संगितल्या. नेट बँकिंग, ऑपरेटिंग सिस्टिम वापरताना लायसनचे महत्व, सॉफ्टवेअर अपडेशन, आणि एंटीवायरसचा वापर, त्याचबरोबर मोबाइल सुरक्षितता आणि सोशल मीडियाचा अती वापर कसा घातक आहे. याबद्दल माहिती दिली.

तृतीय सत्रामध्ये डॉ.सुवर्णा गाडेकर सोनार, अर्पण हॉस्पिटल भुसावळ, यांनी महिला आरोग्य या विषयवार विद्यार्थिंनीशी संवाद साधला. यात त्यांनी विद्दयर्थिनींना खूप खेळीमेळीच्या वातावरणात अवघड विषय सोपा करून सांगितला. तसेच चतुर्थ सत्रामध्ये उपप्राचार्य डॉ.ए.आय.भंगाळे यांनी स्त्री विषयक कायदे या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. प्रथम आणि द्वितीय सत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या जेष्ठ प्राध्यापिका डॉ.सिंधू भंगाळे होत्या. तर तृतीय आणि चतुर्थ सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.सविता वाघमारे होत्या.
कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रा.शुभांगी पाटिल यांनी केले तर आभार प्रा.डॉ.सरला तडवी यांनी मानले. कार्यशाळेबद्धल क़ु पूनम ठोंबरे, कु सोनाली देशमुख, कु हिमानी पाटील, क़ु निकिता राणे या विद्यार्थिनीनी मनोगत व्यक्त केले. अनेक महाविद्यालयाच्या विद्यार्थिंनीनी सहभाग नोंदवला. कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रा.डॉ.जयश्री पाटिल, प्रा.पल्लवी पाटिल, प्रा.नाहिदा कुरैशी, प्रा.स्वप्निल शाह, प्रा.चिन्मया भंगाळे, प्रा.भावना चौधरी, प्रा.खुशबु लढ़े, प्रा.कविता इंगळे यांनी प्रयत्न केले.

Protected Content