यावल प्रतिनिधी । यावल येथील माहेर असलेल्या २९ वर्षीय विवाहितेला पैशांसाठी सासरच्या मंडळींकडून छळ केल्याचा प्रकार २७ नोव्हेंबर रोजी उघडकीला आला आहे. या प्रकरणी सायंकाळी पतीसह ८ जणांवर यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आसमाशेख मोहम्मद नदीम (वय-२९) राहणार वडाळा नाशिक नाशिक ह..मु. गंगानगर यावल यांचा विवाह नाशिक येथील मोहम्मद नदीम समसोद्दिन शेख यांच्याशी रीतिरिवाजानुसार २०१३ मध्ये झाला. लग्नाचे काही दिवस सुरवातीला चांगला गेल्यानंतर पती मोहम्मद नदीम याने विवाहितेला माहेरहून फ्लॅट घेण्यासाठी पैशांची मागणी केली. त्यानुसार विवाहितेच्या आई-वडिलांनी पैसे दिले. त्यानंतर तोच प्लॅट गहाण ठेवून पती मोहम्मद नदीम याने पुन्हा भाड्याचे घर घेण्यासाठी वेळोवेळी त्याला पुन्हा पैशांची मागणी केली. त्यानंतर शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. त्यानंतर पतीसह सासू सासरे नणंद, फुवा आणि चुलत दीर यांनी विवाहितेच्या यावल येथील घरी २३ नोव्हेंबर रोजी शिवीगाळ केली. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून पती मोहम्मद नदीम समसोद्दिन शेख, सासरे समसोद्दिन अल्लाउद्दीन शेख, सासू यास्मिनबी समसोद्दिन शेख, दिर आजीम शेख समसोद्दिन शेख, नणंद अंजुमनबी निसार शेख, फुवा मुक्तार शेख, शफिक शेख आणि चुलतदीर जुबेर शेख हुसेन खान सर्व रा. नाशिक यांच्याविरोधात तक्रार दिली. विवाहितेच्या तक्रारीवरून २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल असलम खान दिलावरखान करीत आहे.