Home Cities एरंडोल एरंडोल येथील माहेरवाशिणीचा छळ ; गुन्हा दाखल

एरंडोल येथील माहेरवाशिणीचा छळ ; गुन्हा दाखल

0
30

एरंडोल प्रतिनिधी । मुलगी झाली म्हणून येथील माहेरवाशिणीचा सासू, सासरे, पती, व इतर सासरच्या लोकांकडून वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ करून तिला मारहाण होत होती. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला सासरच्या मंडळीं विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींमध्ये मधुकर नाटू भामरे, नाटू खंडू भामरे, वच्‍छलाबाई नाटू भामरे, दर्शन सोनार सर्व राहणार दौलत नगर सिडको नाशिक तसेच संजय नाटू सोनार, यांचा समावेश आहे. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे हेडकॉन्स्टेबल छाया खैरे या पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत.

 

 


Protected Content

Play sound