जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळा अंतर्गत असलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी अध्ययन व संशोधन केंद्राच्यावतीने उद्या गुरूवार २४ ऑगस्ट रोजी “बोलीतील कवितांचे सादरीकरण” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या दृक-श्राव्य सभागृहात दुपारी २:३० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात धुळे येथील डॉ. सदाशिव सुर्यवंशी आणि अमळनेर येथील शरद धनगर हे दोन कवी बोलीतील कवितांचे सादरीकरण करतील. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी राहणार आहेत.