जळगाव (प्रतिनिधी) महापालिका आरोग्य विभागाच्या पथकातर्फे आज फुले मार्केट परिसरात प्लास्टिक कारवाई करण्यात आली.
यात पथकाने फुले मार्केटमधील ३० दुकानांची तपासणी केली असता चार दुकानदारांकडून १५ किलो नॉन ओवन बॅग जप्त करण्यात आल्या. यात जितेंद्र निंबा शिनकर, ओम ट्रेडिंग, दिलीप राजपाल बाबा किरणा, गोविंदा रामभाऊ अंड कंपनी यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.
आयुक्त डॉ. उदय टेकाळे व आरोग्य अधिकारी उदय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधीक्षक शरद बडगुजर, अशोक नेमाडे, संजय अत्तरदे, आरोग्य निरीक्षक डी.डी. गोडाले, मोकदम रफिक शेख, भगवान तायडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.