भरधाव वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भरधाव वाहनाच्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावर मंगळवारी घडली. दोन दिवसांपूर्वी याच रस्त्यावर रस्ता ओलांडणार्‍या एका शाळकरी मुलाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता. नवनाथ केरबा सातव असे मृत्युमुखी पडलेल्या पादचार्‍याचे नाव आहे. याबाबत निलेश नारायण जगताप यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश जगताप यांच्या बहीणीचे दीर नवनाथ सातव नगर रस्त्यावरील आव्हाळवाडी परिसरातून निघाले होते. रस्ता ओलांडणार्‍या सातव यांना भरधाव वाहनाने धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळी न थांबता पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या सातव यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक गोडसे तपास करत आहेत. नगर रस्त्यावरील आव्हाळवाडी परिसरात रस्ता ओलांडणार्‍या शाळकरी मुलाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. दोन दिवसात नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात रस्ता ओलांडणार्‍या दोन पादचार्‍यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. नगर रस्ता पादचार्‍यांसाठी धोकादायक झाला आहे. नगर रस्त्यावर गंभीर स्वरुपाच्या अपघातात वाढ झाली

Protected Content