पारोळा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील चोरवड येथे श्री दत्त जयंतीनिमित्ताने जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा यात्रा उत्सव असतो. या यात्रा उत्सवात दरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली यात्रा उत्सव कमिटीची शांतता बैठक घेण्यात आली.
पारोळा तालुक्यातील चोरवड येथे सालाबादाप्रमाणे मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला श्री दत्त जयंती निमित्तानेजळगाव जिल्ह्यातील मोठा उत्सव यात्रा निमित्ताने पार पाडतो, आणि या दत्ताच्या नावाने अनुरूप असलेले दत्त बाबाचे चोरवड म्हणून त्या गावाची नावलौकिकता आहे. जवळपास ६ ते ७ एकर जमिनीच्या एरियामध्ये हा यात्रा उत्सव ग्राम कमिटीच्या माध्यमातून भरण्यात येतो. जवळपास ४५० वर्षांपूर्वीची ही परंपरा आज तागायत अबाधित आहे. चोरवड येथे एक मुखी दत्ताचे दोन मंदिर आहेत. गावाच्या पश्चिम दिशेत असलेल्या या मंदिराच्या मोठे दत्त व लहान दत्त असे दोन भावांमध्ये विभाजन झालेले आहे.
श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने यावर्षी सुद्धा अननसधारण असे महत्त्व आले आहे. यात्रा उत्सव काळात भाविकांची अलोट गर्दी या परिसरात असते. त्यानिमित्ताने कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच शांतता व नियोजन समितीची बैठक झाली सर्वप्रथम आलेल्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ व शाळा देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर आवारात गावातील प्रथम नागरिक सरपंच,उपसरपंच,कार्यकारणी सदस्य, व गावातील समस्त ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत यात्रा उत्सव समितीचे गठन करण्यात आले. या समयी यात्रा उत्सव समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष सचिव निवड करण्यात आली.यात्रा उत्सव दरम्यान कायदा सुव्यवस्था संदर्भातील काही धडे व सूचना पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी सांगितले, तर सरपंच राकेश पाटील यांनी यात्री उत्सव निमित्ताने आलेले सर्व यजमान व भाविक भक्तांना गावातील सर्व अबाल वृद्ध व तरुण मित्र मंडळाने सहकार्याची भावना व मदत हेतूने कार्य करावे असे आवाहन केले.
याप्रसंगी सुनील पाटील, राजेंद्र पाटील, शिरसमणी सरपंच अरुण पाटील, शिरसमणी येथील पोलीस पाटील, चोरवड येथील सुभाष जगन्नाथ पाटील, विजय पा,अरुण नागराज पा,प्रल्हाद कुंभार, विलास सोनार, नाना जोशी, भूषण महाजन, निलेश पा,सुनील पाटील, सिताराम महाजन, उत्तम मरसाळे, मल्हार कुंभार, रमेश पा,विकास सुतार, तुकाराम भिल, प्रवीण मोरे, अरुण पाटील, रोहित भाटिया, प्रभाकर पाटील, अशोक पाटील, अनिल पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वास पाटील यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीरिते पार पाडण्या कामी ग्रामपंचायत सर्व सदस्य तसेच ग्रामसेवक बेलदार आप्पा, नितीन पाटील, भोला पाटील, वाटर मॅन संजू जगताप, शिपाई समाधान पाटील यांनी परिश्रम घेतले.