चाळीसगाव, प्रतिनिधी | येथील शहर पोलीस स्टेशनमध्ये आज (दि.६) सायंकाळी ७.०० वाजता बकरी ईद व गोकुळ अष्टमीनिमित्त दहीहंडी सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटी बैठक पार पडली. बैठकीत मान्यवरांनी ट्रॅफिक समस्या व वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा या समस्या मांडल्या. सणाच्या दिवशी संबंधितांना तशा सूचना द्याव्यात व दोन्ही सण हिंदू-मुस्लिम यांनी एकतेने व शांततेत पार पाडावे, असे मनोगत सर्व मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी डीवायएसपी उत्तमराव कडलग, पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, तहसीलदार अमोल गोरे, नायब तहसिलदार सोनवणे, पीएसआय नितीन वाघ, विजय साठे, मच्छिन्द्र रणमाळे, जेष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर, शिवाजी राजपूत, वसंतराव चंद्रात्रे, शशिकांत साळुंखे, भगवान पाटील, अल्लाउद्दीन शेख, गफूर पहेलवान, संजय पाटील, रामचंद्र जाधव, रवींद्र पाटील, दिपक पाटील, दिलावर मेम्बर, संभा जाधव, अस्लम मिर्जा, फकिरा मिर्जा, लुकमान शाह, श्री. रफिक व पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते.