यावल प्रतिनिधी । यावल पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महावितरणचे सहाय्यक अभियंता महेश वावरे यांच्या उपस्थितीत नवरात्रोत्सव आणि घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला शांतता समितीचे जेष्ठ सदस्य हाजी शब्बीर खान मोहम्मद खान, चंद्रकांत देशमुख, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले, हाजी ताहेर शेख चाँद, पंचायत समितीचे गटनेते शेखर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार पाटील, प्रमोद नेमाडे, गोपाळसिंग पाटील, इंटकचे जिल्हा अध्यक्ष भगतसिंग पाटील, माजी नगरसेवक गुलाम रसुल गुलाम दस्तगीर, काँग्रेसचे कदीर खान यांच्यासह दुर्गा उत्सव मंडळाचे कार्यकर्ते प्रामुख्याने या बैठकीला उपस्थित होते.
यावेळी पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांनी सांगीतले की, मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी कोरोना विषाणु संसर्गाचा प्रार्दुभाव कमी झाला असला तरी कोविड१९चे नियम मात्र कायम ठेवण्यात आले असल्याची माहीती देवुन सर्व मंडळाचे पदाधिकारी यांनी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करीत नवरात्र उत्सव साजरा करावा असे आवाहन केले. या वर्षी यावल शहरात एकुण ४२दुर्गात्सव मंडळ तर यावल पोलीस स्टेशनच्या ग्रामीण क्षेत्राच्या हद्दीत १२० मंडळा तर१८ खाजगी दुर्गात्सव मंडळांनी असे एकुण १८० दुर्गात्सव मंडळांनी यंदाच्या नवरात्र उत्सवात सहभाग घेतले आहे