मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मोहरम सणाच्या निमित्ताने जळगाव शहर पोलीस ठाण्यात विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या नेतृत्वात गुरूवारी २७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. मुस्लिम बांधवांनी मोहरण सण शांततेत आणि आनंदात साजरे करावे असे, आवाहन पोलीस उपअधिक्षक संदीप गावीत यांनी केले आहे.

 

मोहरम सणाच्या निमित्ताने शहर पोलीस ठाण्यात शांतता कमिटीच्या सदस्यांची बैठक पार पडली. या बैठकीला सर्वधर्मीय  व सर्वपक्षीय नागरिक पदाधिकाऱ्याचा सहभाग दिसून आला. जळगाव शहरातील विकासासाठी सर्वधर्मीय बांधवांनी मोहरम सण शांततेत आनंदाने साजरा करावेत असे आवाहन पोलीस उपअधिक्षक संदीप गावीत यांनी केली आहे.

 

शांतता कमिटीच्या बैठकीला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास शेंडे, जिल्हापेठ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील, शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. योगेश जयस्वाल,

याप्रसंगी मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारूख शेख, माजी उपमहापौर करीम सलार यांच्यासह मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content