यावल( प्रतिनिधी)। येथे नव्याने रुजु झालेले फैजपूर विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत तात्काळ शांतता सामितीची बैठक सकाळी 11 वाजता संपन्न झाली. आगामी काळातील येणाऱ्या लोकसभा निवडणुका व विविध सणासाठी शांतता समितीची बैठक तहसीलदार जितेंद्र कुंवर, नगराधक्षा सुरेखा कोळी, शांतता समितीचे सदस्य हाजी शब्बीर खान मोहम्मद खान, किशोर कुलाकणी, नगरसेवक सैय्यद युनुस सैय्यद युसुफ, नगरसेवक शेख अस्लम शेख नबी, माजी नगराध्यक्ष शशांकदादा देशपांडे, भगतसिंग पाटील, गोपाळ पाटील, माजी नगरसेवक इकबाल खान नसीर खान, हाजी गफ्फार शाह, यांच्यासह विविध क्षेत्रातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
जवानांना दिली श्रध्दांजली
शांतता समितीच्या बैठकीच्या सुरुवातीस आपल्या देशातील जम्मु काश्मीरच्या पुलवामा येथे अतिरेकी ह्ल्यात शहीद झालेल्या ४४ जवांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रत्येक समाजातील विघ्न संतोषी मंडळी गावातील शांतता कशी भंग होईल यासाठी सक्रीय झाले असुन, सोशल मिडीयाच्या माध्यमातुन दोन समाजा मध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असुन, या विषयावर अल्पसंख्याक समाज आपणा असुरक्षीत समजु लागला आहे. येणाऱ्या काळात हिन्दु मुस्लीम बांधवामध्ये जातीय तनाव निर्माण करण्यासाठी काही लोक सक्रिय झाले आहे.
शांततेसाठी नागरीकांकडून सहकार्य अपेक्षीत- डीवायएसी पिंगळे
यासाठी पोलीस प्रशासनास अधिक दक्ष राहण्याची सुचना हाजी शब्बीर खान यांनी मांडल्यात. तहसीलदार जितेंद्र कुंवर यांनी ही आपले मनोगत व्यक्त केली. विभागीय पोलीस अधिकारी नरेन्द्र पिंगळे यांनी सांगीतले की, शांतता राखणे ही जबाबदारी फक्त पोलीस प्रशासनाची नसुन चांगल्या शहरी नागरीकांची देखील असुन, गावाची शांतता राखण्याची आपली सर्वांची असते, विशेष करून युवा वतरूण पिढीकडे लक्ष देणे आज गरजे असून, सुरक्षीतेच्या दुष्टीने शहरातील प्रमुख चौकातील भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे महत्त्वाचे असुन या करीता आपण सर्वांनी प्रयत्न करणे ही आजची गरज असल्याचे, पिंगळे यांनी सांगीतले. या बैठकीचे सुत्रसंचालन व आभारपोलीस उपनिरिक्षक सुजितकुमार यांनी मानले.