पवारांची गुगली : विधानसभेच्या निकालाबाबत केले मोठे भाष्य

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आपल्या नेहमी सूचक बोलण्यासाठी ख्यात असलेले शरद पवार यांनी आज आगामी विधानसभा निवडणुकीबाबत केलेले वक्तव्य हे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे.

आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर भाष्य केले. यात प्रामुख्याने त्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या अरेरावीला लोकांना झटका दिल्याचे सांगितले. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अहंकारी वक्तव्ये केली. चारशेपार जागा आल्यानंतर संविधान बदलणार असल्याचे वक्तव्य हेगडे या नेत्याने केले. यामुळे विरोधकांना एकगठ्ठा मते मिळून भाजपला बहुमत मिळाले नाही. तथापि, चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांच्यामुळे केंद्र सरकार भक्कम स्थितीत असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत जसे यश मिळाले तसे विधानसभेत मिळवायचे असेल तर एकोप्याने प्रयत्न करावे लागतील. अन्यथा लोकसभेसारखा निकाल लागणार नाही असे वक्तव्य शरद पवार यांनी केले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Protected Content