मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास राहिला नाही, त्याचे खापर भाजपावर फोडले जात आहे. ईडी, एसीबी यांची नियमित चौकशी सुरु आहेत. त्यांच्या चौकशीत कुठेही मुख्यमंत्री हस्तक्षेप करत नाही.त्यामुळे शरद पवारांनी केलेले आरोप हे त्यांचे अपयश लपविण्यासाठी केले जात असून आगामी काळात पवारांच्या बाजूने एक आकडी संख्या असणारे लोकही राहतात का? याकडे त्यांनी बघावं, असा थेट इशारा जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी दिला आहे.
मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश करत आहेत. यावरून पवारांनी भाजपावर टीका करत नेत्यांवर ईडी, एसीबी सारख्या यंत्रणांचा दबाव आणून पक्ष बदल करण्यास भाग पाडत आहेत. एवढेच नव्हे, तर आमदारांना खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फोन करत असल्याचा आरोपही केला होता. त्यावर गिरीश महाजनांनी शरद पवारांना इशारा देत काँग्रेस-राष्ट्रवादीत 50 पेक्षा अधिक आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत. त्यामुळे आगामी काळात पवारांच्या बाजूने एक आकडी संख्या असणारे लोकही राहतात का? याकडे त्यांनी बघावं,असा इशारा दिला आहे.
पवारांच्या आरोपावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, आपल्या पक्षातून लोक का जात आहेत? याची आत्मपरीक्षण करावे. विरोधी पक्षातील अनेक लोक भाजपात येण्यासाठी उत्सुक आहेत. मुख्यमंत्र्यांनी कोणत्या आमदारांना फोन केला हे पवारांनी सांगावे. तर येत्या आठवडाभरात अनेक पक्षप्रवेश होतील असा दावा गिरीश महाजनांनी केला आहे.