नाशिक – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । नाशिकमधील देवळाली-लहवीत दरम्यान मुंबईहून जयनगरकडे निघालेल्या पवन एक्सप्रेसचे सात डब्बे रूळावरून घसरल्याची दुर्घटना दुपारी घडली आहे. या अपघातात काही प्रवाशी जखमी झाल्याचे समोर आले आहे
याबाबत वृत्त असे की, मुंबईहून जयनगर येथे निघालेल्या (११०६१) पवन एक्सप्रेसचे सात डबे नाशिकमधील देवळाली-लहवीत दरम्यान रेल्वे रूळावरून घसरल्याची घटना रविवारी ३ एप्रिल रोजी दुपारी ३ ते ३.३० वाजेच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत काही प्रवाशी जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाल्याबाबतचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनस्थळी धाव घेतली आहे. या अपघातानंतर रेल्वेची अपलाईनवरील वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा रेल्वे प्रशासनाकडून मदतीचे कार्य सुरू आहे.