जळगाव प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. सर्वप्रथम कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या जळगाव आकाशवाणी निवेदक प्रेरणा देशमुख शालेय समन्वयक के.जी.फेगडे, चंद्रकांत भंडारी, मुख्या.रेखा पाटील, ए.टी. झांबरे विद्यालयाचे मुख्या. डी.व्ही.चौधरी, किलबिल बालक मंदिराच्या मुख्या. मंजुषा चौधरी यांच्याहस्ते गुढीपाडव्यानिमित्त गुढीची पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रमुख पाहुण्या प्रेरणा देशमुख यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या निवेदक शैलीत अतिशय सुंदर रित्या मार्गदर्शन केले. मोबाईल ,टीव्ही बाजूला सारून आपल्या आईवडिलांशी संवाद साधवा, दिवसभर काय केले ते आठवून त्याविषयी संवाद साधा, नियमित अभ्यास करा, सुसंस्कृत होऊन सर्वाचा आदर करा, अभ्यास आणि खेळ यांचा समतोल राखा, जो विषय आवडेल त्यात आनंदाने सहभागी व्हा व अभ्यास करा, अशा शब्दात त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणात्मक केले. काही विद्यार्थ्यानी विविध कलागुण सादर केले, तर काहींनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यांनतर सर्व विद्यार्थ्यांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. उपशिक्षिका कल्पना तायडे, सरला पाटील व दीपाली चौधरी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले तर यशस्वीतेसाठी उपशिक्षक योगेश भालेराव, सुधीर वाणी, सुनील नारखेडे आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.