अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पातोंडा येथील विविध कार्यकारी विकास सोसायटीची नुकतीच निवडणूक पार पडली. अमळनेर तालुक्याचे लक्ष पातोंडा विकास सोसायटीने वेधून घेतले होते. तालुक्यातील पातोंडा विकास सोसायटी मोठी असून ही निवडणूक चुरशीची झाली होती. या निवडणुकीत परिवर्तन पॅनलला सात जागा तर बहुजन शेतकरी पॅनलला सहा जागा मिळाले.
तसेच चेअरमन पदाची व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक निर्णय अधिकारी यांनी 18/2/2022 शुक्रवारी घोषीत केली होती.
परिवर्तन पॅनल चे सात सदस्य यांनी आपण कुठेच सहलीला न जाता आपण गावातच राहू असा संदेश दिला. चेअरमन पदासाठी व व्हाईस चेअरमन पदा साठी पॅनल प्रमुख संदीपराव पवार, प्रवीण बिरारी, अजतराव सूर्यवंशी यांनी माजी सरपंच व नवनिर्वाचित सदस्य सुनील गुलाबराव पवार यांची चेअरमन पदा साठी तर व्हाईस चेअरमन पद साठी जगन्नाथ राघो सोनवणे यांचे नाव घोषित केले.
सुनील गुलाबराव पवार यांनी विविध पद भूषवले असून त्यांनी या अगोदर विकास सोयायटीत पद भूषवले असून त्यांना अनुभव असल्याने परिवर्तन पॅनलचे सात सदस्यांनी पॅनल प्रमुखाणी घोषित केलेले नावाला पॅनल च्या सदस्यांनी सहमत दर्शवले. परिवर्तन पॅनल कडून चेअरमन पदा साठी अर्ज सुनील गुलाबराव पवार तर व्हाईस चेअरमन पद साठी जगन्नाथ राघो सोनवणे यांनी अर्ज भरला होता.तर बहुजन शेतकरी पॅनल कडून उमेदवार किशोर राजाराम मोरे, राहुल वसंत लाबोळे यांनी अर्ज सादर केला होता. तर मतदान प्रकिया मध्ये सुनील गुलाबराव पवार व जगन्नाथ राघो सोनवणे यांना सात मते मिळाली तर बहुजन शेतकरी पॅनल कडून उमेदवार किशोर राजाराम मोरे, राहुल वसंत लांबोळे यांना सहा मते मिळाली.
निवडणूक निर्णय अधिकारी विवेक जगताप यांनी चेअरमन पदा साठी सुनील गुलाबराव पवार, व्हाईस चेअरमन जगन्नाथ राघो सोनवणे यांचे नाव घोषित केले यावेळी संस्थेच्या सेक्रेटरी वाणी, कर्मचारी यांनी सहकार्य केले. यावेळी संस्थेच्या कार्यलयात सर्वसाधारण सभेत परिवर्तन पॅनल चे सदस्य व बहुजन शेतकरी पॅनल चे सदस्य उपस्थित होते.
तसेच निकाल जाहीर होताच परिवर्तन पॅनल कडून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी पॅनलचे प्रकाशक जितेंद्र पवार, सहकार्य निवृत्त मुख्यध्यापक जयवंतराव पवार, सुकलाल बोरसे , मोरेश्वर पवार, रघुनाथ चौधरी, गजानन पाटील, मेघानाथ सुर्यवंशी , अशोक पवार, दिलीप पाटील दापोरी, विठ्ठल बोरसे, सुनील चौधरी, हिरामन माळी, भगवान निंबा खैरनार विनोद पवार, अतुल पवार ,ज्ञानेश्वर सोनवणे, हिरालाल माळी नाद्री, प्रवीण पवार, हेमंत देशमुख, प्रशांत पवार, रोहित पवार, मंगेश पवार, हर्षल पवार उपस्थित होते.