जळगाव प्रतिनिधी । पूर्ववैमनस्यातून अचानकपणे चार ते पाच जणांनी घरात येवून पती-पत्नीच्या डोक्यात बियरच्या बाटल्या फोडून व मारहाण करून जखमी करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील दोघांना अटक करण्यात आले आहे. प्रशांत भिवराज कोळी (वय-30) रा. जैनाबाद आणि महेंद्र अशोक महाजन (वय- 23) रा. तळेले कॉलनी अशा हल्लेखोरा संशयितांची नावे आहेत.
अशी होती घटना
मिळालेल्या माहितीनुसार, मेहरूण परीसरातील एकनाथ नगरातील रहिवाशी अंबादास सुकदेव वंजारी (वय-45) हे आपल्या पत्नी सुनिता अंबादास वंजारी (वय-40) सह दोन मुले व दोन सुनांसह राहतात. 10 वर्षांपुर्वी त्याच गल्लीत राहणाऱ्या एका तरूणाने पुर्ववैमनस्येतून आज सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास ॲपे रिक्षात चार ते पाच साथीदारांसह अंबादास वंजारी यांच्या घरी येवून मागील भांडण काढत घरासमोर सुनिता ह्या बसलेल्या असतांना त्यांच्या डोक्यात बियरच्या बाटल्या फोडल्या. आपल्या पत्नीला मारहाण करत असल्याचे पाहून अंबादास हे धावून आले असता त्यातील एकाने फायटरने त्यांच्या दोन्ही डोक्यांवर वार केले तर त्यांच्या डोक्यात बियरच्या बाटल्या फोडल्या. दरम्यान घरात असलेल्या मोठा मुलगा राहूलची पत्नी ही गर्भवती असल्याने तिला जमिनीवर ढकलून तिच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची पोत ओरबडून घेतले. हाणामारी केल्यानंतर सर्वजण पुन्हा रिक्षात बसून पळ काढला.
पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची गल्लीत राहणाऱ्या तरूणांच्या लक्षात आल्यानंतर दोघांना जखमीवस्थेत जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दखल केले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एमआयडीसी पोलीसांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली असून अज्ञात हल्लेखोरांच्या विरोधात एमआयडीसी पोलीसात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासात एमआयडीसी पोलीसात मध्यरात्री 2 वाजता राहत्या घरातून ताब्यात घेतले असून आज जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.