सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तापी परिसर विदयामंडळ संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी औषधनिर्माण शास्त्र महाविदयालय फैजपूर यांनी भारतीय पेटेंट कार्यालयाने सलायव्हरी मॉनीटरींग ऑबस्ट्रकटीव्ह जॉन्डीस डिव्हाइस विकसीत करून पेटेंटची नोंदणी दि. ६ जानेवारी रोजी केली आहे.
जॉन्डीस (काविळ) हा एक प्रकारचा आजार आहे. ज्यामध्ये शरीरातील बिलिरुबिनचे प्रमाण वाढते. या पेटेंट मध्ये माजी प्राचार्य व्ही. आर. पाटील, प्रा. अपेक्षा बहूराशी, अमोल चौधरी (चौधरी मेडिकल, सावदा), नबिल शेख, साक्षी झांबरे, निखिल अढलकर, निकीता इंगळे, जागृती वाणी, श्रेयश मिसाल, भार्गवी सोनवणे या संशोधक अभ्यासक यांचा समावेश आहे.
या संशोधित आणि प्रमाणीत केलेल्या पद्धतीसाठी 18 ऑक्टोबर 2024 रोजी अर्ज केला होता यासाठी 23 डिसेंबर रोजी संशोधकांचा नावांची यादी मंजूर करण्यात आली आणि पेटंटला अनुदान मिळाले आहे.