मुंबई (वृत्तसंस्था) जोरदार अतिवृष्टीमुळे ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकून पडली होती. यातील ७०० प्रवाशांना आतापर्यंत सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.
या संदर्भात अधिक असे की, कालपासून मुंबईसह परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. या जोरदार पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील बदलापूरजवळ असणार्या वांगणी येथे महालक्ष्मी एक्सप्रेस अडकून पडली होती. ही रेल्वे गाडी नदीच्या जवळ असल्यामुळे रूळांवर पाणी साचले होते. पाणी अगदी डब्यात शिरण्याच्या मार्गावर असल्याने प्रवासी घाबरून गेले आहेत. एनडीआरएफच्या पथकांनी बचाव कार्यास प्रारंभ केला असला तरी यात अडथळे येत होते. नौदलाची ८ बचाव पथकं, ३ पाणबुड्यांचे पथकं आणि एक सी किंग हेलिकॉप्टरच्या साहाय्याने आतापर्यंत ७०० प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.