यावल प्रतिनिधी । तालुक्यातील जामुनझिरा या आदिवासी वस्तीत डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेतर्फे अर्धवट शिजलेले अंडे वाटप करण्यात आले. याप्रकरणी अर्धवट अंडी शिजवणाऱ्या सेविकेविरोधात कारवाई करा, अशी मागणी नागरिकांतर्फे महिला व बालविकासप्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांना लिखित तक्रारव्दारे करण्यात आली आहे.
येथील महीला व बालविकास प्रकल्प कार्यालया अंतर्गत डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजने अंतर्गत आदीवासी वस्तीवरील गरोदर मातांना शिजलेली अंडी अंगणवाडीच्या माध्यमातुन वितरण केली जातात तेव्हा यावल तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत असलेल्या जामुनझिरा या आदीवासी वस्तीवर असलेल्या आंगणवाडी सेविकेने चक्क अर्धवट शिजलेले अर्थात अर्धवट बॉइल अंडे वितरण केले तेव्हा हा प्रकार नागरीकांच्या निदर्शनास येताच नागरीकांना अर्धवट बॉइल अंडी घेवुन थेट यावल येथील एकात्मिक महिला, बाल विकास कार्यालय गाठले व प्रकल्प अधिकारी यांना अंडी दाखवत सेविके विरूध्द तक्रार केली.
अशा प्रकारे अर्धवट बॉइल केलेले अंडे वाटणाऱ्या सेविकेवर कारवाईची मागणी पोलिस पाटील हिरा पावरा, बिलारसिंग पावरा, भावसिंग पावरा, भाईराम पावरा, नरसिंग बारेला आदींनी केली आहे तेव्हा या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधीत आंगणवाडी सेविकेस नोटीस बजावण्यात आली असुन संर्दभात दोन दिवसात सदरील सेविके कडून लेखी खुलासा मांगवण्यात येईल यात ती दोषी आढळल्यास तिच्या विरूध्द कारवाई करण्यात येईल असे प्रसंगी महीला व बाल विकास प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांनी सांगीतले. दरम्यान सदरची पोषण आहार वितरण करणाऱ्या सेविके कडुन ही जबाबदारी काढुन घेण्यात यावे असे ही तक्रारकर्ते आदीवासी बांधव यांनी प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांच्याशी बोलतांना सांगीतले .