पोपटाचा प्राण सत्तेमध्ये ! : चंद्रकांत पाटलांची घणाघाती टीका

मुंबई प्रतिनिधी | पोपटाचा प्राण सत्तेमध्ये असून मुंबई महापालिकेची सत्ता संपादन करून शिवसेनेला धडा शिकवा अशा शब्दांमध्ये आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हल्लाबोल केला आहे.

 भाजपा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, “पोपटाचा प्राण सत्तेमध्ये आहे!; पाठीत खंजीर खुपसणाऱ्या शिवसेनेला धडा शिकविण्यासाठी मुंबई महानगरपालिका जिंका आणि महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणा, हेच एकमेव उत्तर आहे.” तसेच, अरविंद सावंत यांनी भाजपाची मदत न घेता मुंबईत खासदार होऊन दाखवावं, असं जाहीर आव्हान देखील त्यांनी यावेळी दिलं.  चंद्रकांत पाटील यांनी यावेळी त्यांनी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांना जाहीर आव्हान देखील दिलं.

“यापुढे भाजपा आपल्या बरोबर प्रामाणिकपणे राहिलेल्या, आरपीआय, महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष, सदाभाऊ खोत यांच रयत क्रांती संघटना, विनायकराव मेटे यांची शिवसंग्राम, विनय कोरे यांची जनसुराज्य या पक्षांच्या आधारे आणि संघटन वाढवून आम्ही आमच्या जीवावर सरकार आणू. मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरातमध्ये आम्हाला कोणता पक्ष लागत नाही. त्यामुळे यापुढे विश्वासघात पुरे. काय होतं यांचं विदर्भात, काय अस्तित्व होतं शिवसेनेचं मराठवाड्यात? प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, भाऊसाहेब फुंडकर यांनी हाताला धरून आणलं. जागांचं वाटप केलं, जागा विजयी केल्या. मात्र आता यापुढे शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी सज्ज व्हावे असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकार्‍यांना केले.

 

Protected Content