पर्रिकर म्हणाले अंबानीसाठी मोदींकडून ‘खेळ’; राहुल गांधींचा खळबळजनक दावा

तिरुवनंतपुरम (वृत्तसंस्था)

राहुल गांधी यांनी मंगळवारी गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांची विधानभवनातील त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली यावर दोघांकडून काहीही माहिती माध्यमांना देण्यात आली नाही. परंतु मोदी यांनी खेळ केल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आपल्याला दिल्याचा गोप्यस्फोट केरळच्या कोच्चीमध्ये राहुल यांनी केला.

 

कोच्चीनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल यांनी सांगितले की, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मला सांगितले की, नव्या राफेल डीलशी माझा काहीही संबंध नाही. नरेंद्र मोदींनी अनिल अंबानीला फायदा मिळवून देण्यासाठी हा सर्व खेळ केला. गोवा विधानसभेचे उपसभापती आणि भाजपाचे आमदार मायकर लोबो म्हणाले, राहुल गांधी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेण्यासाठी विशेष दौऱ्यावर आले होते. आजवर पर्रिकरांचा साधेपणा आणि विनम्रतेचे सर्व भारतीयांनी आणि गोवेकरांनी कौतुक केले आहे. ते खुपच साधे-सरळ व्यक्ती असून त्यांच्यासारख्या नेत्याची देशाला आणि गोव्याला अत्यंत गरज आहे. मात्र, राफेल मुद्द्यावर राहुल आणि पर्रिकर यांच्यातील संभाषणाची माहिती त्यांनी दिली नाही. भाजपकडून अद्याप या विषयावर कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहीय.

Add Comment

Protected Content