पारोळा प्रतिनिधी । मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबत आमदार चिमणराव पाटील यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून महत्वाच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा केली.
पारोळा प्रतिनिधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत एरंडोल पारोळा मतदार संघाचे आमदार चिमणराव पाटील यांची व्हीडीओ कॉन्फरन्स व्दारे महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आमदार चिमणराव पाटील यांनी मतदारसंघासह जळगांव जिल्ह्यातील कोरोना संक्रमित रूग्णांची रेमडिसिवर इंजेक्शन, आक्सिजनचा तुडवडा व बेडचा तुडवड्यामुळे होत असलेली गैरसोय त्यासोबतच वीज बिलांमुळे शेतकर्यांना व घरगुती विज धारकांना होत असलेली अडचण, लाकडाऊन केल्यास स्थानिक पातळीवर निर्माण होणार्या अडचणी, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणुन योग्य त्या उपाययोजना आदींसह मतदारसंघातील विविध समस्या मुख्यमंत्री महोदयांच्या लक्षात आणुन दिल्या. तसेच यांचे निराकरण करण्याची मागणी केली.
या विविध समस्यांवर विचार करून लवकरच यावर उपाययोजना करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार चिमणराव पाटील यांना आश्वासित केले. यामुळे आता या समस्या लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती आमदार चिमणराव पाटील यांनी दिली आहे.