पारोळा प्रतिनिधी । जागतिक अपंग दिन गटसाधन केंद्र पारोळा यांच्यावतीने विकास हॉल पारोळा येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट शिक्षणाधिकारी कविता सुर्वे व प्रमुख पाहुणे शा.पो.आ.अधीक्षक प्रीती पवार ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत चौधरी, अपंग कर्मचारी संघटना राज्य अध्यक्ष रवींद्र पाटील, तामसवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख हिम्मत पवार, मंगरुळ केंद्राचे केंद्रप्रमुख भाईदास पारधी, शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष गुणवंत पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कविता सुर्वे आणि चंद्रकांत चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. समाजात दिव्यांगांच्या बाबतीत जनजागृती व्हावी व दिव्यांगांना त्यांच्या हक्क अधिकार मिळावेत यासाठी जनजागृती रॅली पारोळा शहरातून काढण्यात आली रॅलीतील दिव्यांग विद्यार्थ्यांना चंद्रकांत चौधरी यांच्याकडून बिस्कीट पुढे व रवींद्र पाटील यांच्याकडून केळी वाटप करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितेश निकम तसेच आभार सचिन खोंडे आणि कार्यक्रम यशस्वितेसाठी नंदादेवी पाटील, छाया महाजन, सुधीर सरदार, किरण शिरसाट, हंसराज पाटील, जितू वाघ आदिनी परिश्रम घेतले.