पारोळा प्रतिनिधी । येथील अखिल विश्व गायत्री परिवार शातीकुंज हरीद्वार शाखेच्या वतीने शनीमंदिर परिसरातील वस्तीत दिवाळीनिमित्ताने फरांळाचे वाटप करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून पारोळा येथे गायत्री परिवारानुसार वास्तुशांती, पुसंवन, संस्कार, नामकरण, वाढदिवस, विद्यारंभ संस्कार अश्या अनेक विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असतात. आज शहरात विविध घरांमध्ये परिवाराच्या नामस्मरणाने धार्मिक कार्याची व्याप्ती वाढली असुन दर गुरुवारी परिवारातील प्रत्येकाकडे सर्व परीवार जमुन नामस्मरण, जप, संत्सगा बरोबरच गुरूदेवाचे विचार घरोघरी पोहचविण्याचे कार्य करित आहे तसेच गेल्या 4-5 वर्षांपासून शनीमंदिर परिसर, आईमरी माता परिसर येथे गोरगरिबांना फरांळाची पाकीटे , मिठाई यावर्षी देखील वाटप करण्यात आली.
यांची होती उपस्थित
यावेळी सुभाष यशवंत धमके, माधवराव कथ्थुशेठ शिंपी, मार्तड ओंकार शेलकर, मुकेश नवनितलाल गुजराथी, वसंतराव फकिरा कापुरे, गणेश रामकृष्ण शिंपी, दिनेश मार्तड शेलकर सर, रमेश मुरलीधर वाणी, नितीन वसंतराव जगताप, योगेश बारकु मैद सर, जितेंद्र पांडुरंग भुरे, प्रशांत मधुकर येवले, दिलीप चिंधु खैरणार, महेंद्र मुरलीधर भावसार, विजय दत्तात्रय नावरकर, हर्षल रमेश वाणी, सुनील गवांदे, गोपाल महाजन, चंद्रकांत महाजन आदीच्या हस्ते फरांळाचे वाटप करण्यात आले.