Home धर्म-समाज परब यांचे रिसोर्ट लवकरच पडणार – सोमय्या

परब यांचे रिसोर्ट लवकरच पडणार – सोमय्या

0
49

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे रिसोर्ट लवकरच पाडले जाणार असल्याचे भाजपचे किरीट सोमय्या यांनी म्ह्टले आहे.

महाविकास आघाडीतील शिवसेनचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे रिसोर्ट २१ जानेवारीला पडण्याचे निर्देश देण्यात आले होते. रिसोर्ट पडण्यासाठी ३ महिन्याची मुदत देण्यात आली होती. ती मुदत ३ मे रोजीच संपली असून ते रिसोर्ट पाडण्यात यावे असे आदेश देण्यात येणार असल्याचे केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितले आहे, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.  आर्थिक गुन्हे शाखेने जे लिहिले त्यात काही तथ्य नाही, भाजपकडून ब्लॅकमेल केले जाते, असे उद्धव ठाकरे म्हणतात. जर तसे असेल तर तो अहवाल जाहीर करा. आयुक्त संजय पांडे याच्या आदेशावरून एफआयआर नोंदवले जातात, हे लवकरच संपणार असून संजय राऊत यांनी ४२२ ट्वीत केले आहेत. कोर्टात जेव्हा बोलवले जाईल तेव्हा राऊत लगेच विषय बदलत असल्याचेही सोमय्या यांनी म्हटले आहे. .

 

 

 

 

 


Protected Content

Play sound