जानवे ता.अमळनेर (प्रतिनिधी ) आज जानवे गावास जळगाव लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी आघाडी‘चे अधिकृत उमेदवार असलेले गुलाबराव देवकर यांनी भेट दिली. यावेळी देवकर यांनी ग्रामंस्थ व पदाधिकाऱ्यांशी सवांद साधत राष्ट्रवादी आघाडीस सहकार्य करण्याचे आवाहन केले. प्रारंभी गावातील मारूती मंदिरात पूजा व नारळ फोडत आशिर्वाद घेतले. या नंतर ग्रामंस्थासोबत झालेल्या बैठकीत जनता जनार्दनांच्या आशीर्वादाने आपणास संधी मिळाल्यास जानवे रणाईचे , मंगरूळ सह परिसरात होत असल्याच्या पाणी टंचाईच्या निवारार्थ पाझरा नदीचे पाणी पुर्नभरण करुन निसर्डी व लोटा बारी धरणात सोडून या परिसराच्या सिंचनाच्या बाबतीत कायापालट करण्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.
याप्रसंगी पक्षाचे जिल्हा कार्यध्यक्ष विलास पाटील , तालुक्याचे जेष्ठ नेते जिल्हा बॅकेचे संचालक अनिल पाटील , तिलोत्तमा पाटील , प्रदेश ग्रंथालय सेलच्या रिता बाविस्कर , कॉग्रेसच्या नेत्या अॅड.ललीता पाटील , ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील , तालूकाध्यक्ष सचिन पाटील , कार्यध्यक्ष सुरेश पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक , युवक शहराध्यक्ष बाळू पाटील , विध्यार्थी अध्यक्ष सुनिल शिंपी, महिला तालुकाध्यक्षा योजना पाटील , रंजना देशमुख , अलका पवार , आशा चावरिया , कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे , युवकचे प्रदेश सरचिटणीस पराग पाटील , जि. प. सदस्य हिंम्मत पाटील , माजी सदस्य शांताराम पाटील ,प. स. सदस्य प्रविण पाटील , निवृत्ती बागुल , दिपक पाटील , माजी उपसभापती चंद्रकांत पाटील , उदय पाटील , डिंगबर पाटील , अनिल शिसोदे , गौरव पाटील , रावसाहेब पाटील , हेमंत पाटील , प्रविण पाटील , हमीद अली सैयद अली , गुलाब पिंजारी , शाहरूख पठाण , निंबा पाटील , सुनिल पाटील , भैय्यासाहेब पाटील , पंकज पाटील , नारायण कोळी , जितेंद्र पाटील , शिवाजीराव पाटील , धनगर दला पाटील , वसंत पाटील , श्रीनाथ पाटील यांच्यासह राष्ट्रवादी आघाडीचे सर्वच सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थितीत होते.