बिबट्याची दहशत : दिवसा वीज देण्याची ‘महावितरण’कडे मागणी

a7fa0190 9020 4e19 9991 1719b4e291c4 1

रावेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पूरी येथे बिबट्याचा मुक्तसंचार वाढला असुन बिबट्याने आतापर्यंत गावाच्या जवळपास गाई व पारडु यांना ठार मारले असुन घटनेला दोन-तीन दिवस उलटले आहेत. या गावात बिबट्या बद्दल भीतीचे वातावरण असुन आज वनक्षेत्रपाल यांनी रात्रीची विज बंद करून दिवसा विज देण्याची मागणी महावितरण कंपनीकडे केली आहे.

 

या बाबत वृत्त असे की, पूरी शेती-शिवार परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्याचा संचार वाढला असुन सद्या तरी त्याने दोन प्राण्यांना ठार मारले आहे. येथील स्थानिक ग्रामस्थ सांगतात की यापूर्वी सुमारे १५ दिवस आधी बिबट्या येथील गावातील स्थानिकांना शेती-शिवारमध्ये दिसला होता. या भागात नेमणुकसाठी असलेले वनपाल या भागात येत नाहीत, सतत दांड्या मारत असतात. त्यामुळे जंगली प्राणी या भागात हौदोस घालत आहेत. दरम्यान तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी पूरी गावात भेट देवून पाहणी केली आहे.

Add Comment

Protected Content