अमळनेर (प्रतिनिधी ) तालुक्यात पानी फाउंडेशनच्या स्पर्धेची लढत चुरशीची होत आहे . तालुक्यातील राजकारणी व अधिकारी यांनी आपले सर्व लक्ष आनोरे गावांकडे दिलेले असतांना देखिल तालुक्यातील सर्वात वादग्रस्त गावाने एकजुट होत स्पर्धेत दंड थोपटल्याने स्पर्धा चुरशीची केली आहे.
दहिवद गावचे वासुदेव देसले, पोलिस निरीक्षक सटाणा यांच्या प्रयत्नातून आज गावांत जेसीबी कंपनीचे २२० मॉडेलचे पोकलेन पाणी फौंडेशनच्या यांत्रिक कामांसाठी गावांत आले. शेतीला पाण्याची गरज असते व त्यासाठी राज्यात पाण्याचे जलसाठे निर्माण झाले पाहिजेत हा शतकापूर्वी असलेला दृष्टीकोन असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करून वासुदेव देसले व सरपंच सुषमा वासुदेव देसले यांनी पोकलेनचे स्वागत केले .गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून नाला खोलीकरण करण्याच्या स्थळा पर्यंत ढोल-ताश्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली . दहिवद गावाच्या पाणी पुरवठा विहिरीजवळ नाला खोलीकरण करण्याचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी सपत्नीक वासुदेव देसले यांनी धरती मातेला वंदन करत पोकलेनची पुजा केली. याकामासाठी गावातून परराज्यात गेलेले म्हणजेच गुजरातहुन दिव्याग बांधव छबिलाल पाटील निमझरीकर, राजु दादा देसले , हर्षवर्धन पाटील उर्फ लाढू यांचे मित्र त्यांच्या शाळकरी परिवार गृप तर्फे १७ हजार रुपयांचे आर्थिक योगदान सरपंच यांच्याकडे सुपूर्द केले. तो निधी पानी फाउंडेशन टीम कडे देण्यात आला. याप्रसंगी वृक्ष मित्र पंकज पाटील यांनी गावकऱ्यानी सक्रीय सहभाग नोंदवून आर्थिक मदतीचे आव्हान केले. पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी गावातील गट तत् बाजूला ठेऊन सर्वानी एकजूट होण्यातच गावाचा विकासाचे मूळ असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी फौन्डेशनच्या कामांत पहिल्या दिवसापासून सक्रीय सहभाग नोंदवून दान देणाऱ्या लोकांचे व खोलीकरणासाठी मोफत जेसीबी उपलब्ध करून देणाऱ्या मारवड विकास मंचाचे आभार मानले. दरम्यान, अमरधाममध्ये पानी फांऊंडेशनच्या संस्कृतीनुसार दिव्यांग बांधव छबिलाल पाटील याना तीन टाळ्या व तीन फुले देवून सत्कार करण्यात आला.