‘या’ सहकारी संघाच्या चेअरमनपदी पांडूरंग सराफ तर व्हाईस चेअरमनपदी अतुल भालेराव

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी फैजपूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष व यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती पांडूरंग दगडू सराफ यांची तर व्हाईस चेअरमनपदी अतुल भागवत भालेराव यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

या संस्थेची विशेष सभा संघाच्या सभागृहात पार पडली. सहकार संस्था सहाय्यक निबंधक अच्युत्य भागानारे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी पुढील वर्षासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या हितासाठी कार्यरत असलेल्या या संस्थेला शेतकऱ्यांचा आधारस्तंभ मानले जाते.

नवीन चेअरमन पांडूरंग सराफ व व्हाईस चेअरमन अतुल भालेराव यांचे यावल-रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे, भाजप तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, माजी चेअरमन नरेंद्र नारखेडे, माजी व्हाईस चेअरमन तेजस पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे, तसेच जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सविता अतुल भालेराव आदी पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या निवडीनंतर परिसरातून दोन्ही नविन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या नेतृत्वात संघ अधिक सक्षम आणि शेतकरीहितैषी कार्य करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Protected Content