मानवाधिकार न्याय जन सेवा ट्रस्ट सल्लागारपदी पांडूरंग चौधरी

जळगाव प्रतिनिधी । मानवाधिकार न्याय जन सेवा ट्रस्ट, नवी दिल्ली उत्तर महाराष्ट्र विभागीय विधी सल्लागारपदी पांडूरंग सी. चौधरी यांची संस्थापक व राष्ट्रीय कार्याध्यक्ष दिनेश गुप्ता यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश सचिव अनिल नंन्नवरे यांनी नियुक्तीपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले.

अॅड. पांडूरंग चौधरी हे जळगाव, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद येथील जिल्हा व सञ न्यायालयात मोटर अपघाताचे नुकसान भरपाई तसेच भुसंपादनाचे विधिज्ञ आहेत, त्यांना समाजाचे कामासोबतच सामाजिक कार्याची आवड आहे आजपर्यंत त्याच्या वकीली व्यवसायात अनेक चढ उतार आले  परंतु ते कधीच डगमगले नाहीत समाजात नेहमी सामाजिक विविध उपक्रम  व कार्यक्रम आयोजित करून गरजवंताना सहकार्य करत असतात,समाजा प्रती काही देणे लागते या हेतूने त्यांनी जळगाव  जिल्ह्य़ातील  ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्याना आपल्या कार्यालयात शरण दिले आहे,त्या विद्यार्थ्यांचा निवासा बरोबर त्यांचा उदरनिर्वाह तसेच शैक्षणिक सर्व खर्च त्यांनी करून आतापर्यंत जवळपास आठ ते नऊ वकिल तयार केले आहेत,तीस वर्षांच्या वकीली व्यवसायाच्या अनुभवातून चांगले व वाईट  व्यक्ती भेटल्या, अंत्यत मृदू स्वभावाचा अनेकांनी चांगूलपणाचा फायदा तर कुणी गैरफायदा घेतला,अनेक गोर गरीब पक्षकारांकडून फी न घेता मोफत दावे चालविले आहेत,अनेकांचे कुटूंब चालविले आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना उत्तर महाराष्ट्र विभागीय विधी सलाहकार पदी नियुक्ती करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश आई.टी.सेल सचिव डॉ. राजनराम जैसवाल, राष्ट्रीय प्रभारी संजय गुप्ता, प्रदेश सचिव अनिल नंन्नवरे,उत्तर महाराष्ट्र विभागीय मुख्य प्रवक्ता प्रविणकुमार बाविस्कर, जळगाव जिल्हा अध्यक्ष सुनिल नंन्नवरे, जिल्हा युवक अध्यक्ष धनराज साळूंके, जिल्हा उपाध्यक्ष योगेश बाविस्कर, राजेंद्र चौधरी, सचिव ज्ञानेश्वर पाटील, जळगाव महानगर प्रमुख किरण भावसार, जिल्हा युवक उपाध्यक्ष उमेश निकुंभ व मानवाधिकार न्याय जन सेवा ट्रस्ट चे पदाधिकारी उपस्थित होते.

अॅड. पी.सी.चौधरी यांचे निवडीचे प्रविणकुमार बाविस्कर, उत्तर महाराष्ट्र विभागीय मुख्य प्रवक्ता, महीला पदाधिकारी डाॅ.रूचिता धनगर, मंगलाताई सोनवणे, वर्षाताई बाविस्कर, जिल्हा महीला सल्लागार, अॅड.शोभाताई खैरनार, उत्तर महाराष्ट्र प्रभारी तथा धुळे जिल्हा अध्यक्ष हिरालाल वाकडे, बांभोरी(प्र.चां.) उपसपंच भिकन नंन्नवरे, गोपालशेठ नंन्नवरे, रवीशेठ नंन्नवरे, अनिल नंन्नवरे,अॅड.विशाल घोडेस्वार, रोहन पराये, नंदकिशोर जगताप, आकाश पाटील आदींसह अभिनंदन केले.

 

 

 

Protected Content