जळगाव प्रतिनिधी । केद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल आज जाहिर झाला असून काशिनाथ पलोड इंग्लीश मेडीयमचा निकाला 100 टक्के लागला असून अनुष्का विनय सोनवणे ही 96.8 टक्के मिळून शाळेत पहिली आली. समाज शास्त्र विषयात सहा जणांना 100 पैकी 100 गुण मिळाले तर एकाला गणितात आणि एकाला संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण मिळाले आहे.
काशिनाथ पलोड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये दहावी सीबीएसई एकूण 121 विद्यार्थी परिक्षेला बसले होते. प्रथम क्रमांक – अनुष्का विनय सोनवणे (96.8 टक्के), द्वितीय क्रमांक – इशांत निलेश पाटील (96 टक्के), टीना सतिष चौधरी (96 टक्के), अर्थव भूषण कोतकर (96 टक्के), तृतीय क्रमांक- श्वेता अनंत खडसे (95.8 टक्के), चतुर्थ क्रमांक – सोहम पुष्कराज वाणी (95.6 टक्के), महेश प्रदीप शेकोकर (95.6 टक्के) आणि अनिकेत गोविंदराव पाटील (95.2 टक्के) अशा 9 जणांचा निकाला 95 टक्केच्या वर लागला आहे.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शालेय समिती अध्यक्ष धनंजय जकातकर, प्राचार्य अमितसिंह भाटीया यांच्यासह शालेस समितीचे सदस्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.