भडगाव (प्रतिनिधी ) सोमवार १० रोजी आलेल्या अवकाळी पावसामुळे भडगाव तालुक्यातील गावामध्ये वादळी पावसाने मोठे नुकसान झाले होते. यासंदर्भात तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी जिल्हा प्रशासनास दिले होते. झालेल्या नुकसानाची पाहणी पालकमंत्री आज गिरीश महाजन यांनी केली.
या पाहणी दौऱ्यात तहशिलदार गणेश मरकड, कृषी अधिकारी बी. बी . गोरडे, पं. स. सभापती रामकृष्ण पाटील, नगराध्यक्ष अतुल पाटील, भाजप तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डाॅ संजीव पाटील, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अमोल पाटील, अमोल शिंदे, जि. प. सदस्य मधू काटे, पाचोरा सभापती बन्सीलाल पाटील, पाचोरा तालुकाध्यक्ष सुभाष पाटील, पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे, पोलिस उपनिरीक्षक पठारे, माजी जि प सदस्य श्रावण लिंडायत, सरचिटणीस अनिल पाटील, शहराध्यक्ष शैलेश पाटील, धनराज पाटील, व वडजी, पांढरद, पिचर्डे, बात्सर गावातील सरपंच, सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दि.१० रोजी भडगाव तालुक्यातील बोदर्डे, निंभोरा, पिचर्डे, कनाशी, कोठली, बातसर, लोण पिराचे या गावात झालेल्या वादळी पावसामुळे केळी, पपई व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबतची माहिती पालकमंत्री महाजन यांना मिळताच त्यांनी जिल्हाधिकारी डाॅ. अविनाश ढाकणे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून नुकसानीची माहिती घेतली. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झालेल्या असताना हातातोंडाशी आलेल्या पीकाचे वादळी वाऱ्याने नुकसान झालेल्या शेतक-यांच्या पाठीशी शासन भक्कमपणे उभे आहे या भावनेने पालकमंत्री महाजन यांनी या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानीचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी डाॅ. ढाकणे यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश राजेंद्र कचरे, उपविभागीय अधिकारी पाचोरा यांना दिले होते.प्रशासनाकडून प्राप्त प्राथमिक माहीतीनुसार ४९९ शेतकऱ्यांचे साडेतीनशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात ३९४ हेक्टर केळी तर ५४ हेक्टर इतर पिकांचा समावेश आहे.या नुकसानग्रस्त भागाची पाहणी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केली. या पावसामुळे केळीचे मोठे नुकसान झाले आहे त्यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधला.