Home Cities जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यादिनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण

जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यादिनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण


जळगाव प्रतिनिधी । भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या जिल्हास्तरीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात १५ ऑगस्ट, २०२१ रोजी सकाळी ९ वाजता राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कळविली आहे. 

 भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७४ व्या वर्धापनदिन समारंभानिमित्ताने जिल्हास्तरीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते रविवारी १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता ध्वजारोहण होणार आहे. यावेळी उपस्थितांनी कोरोना विषाणूची पार्श्वभूमी लक्षात घेता ध्वजारोहण समारंभास सर्वांसाठी मास्क लावणे आणि सामाजिक अंतर संदर्भातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज बुधवारी ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.


Protected Content

Play sound