रावेर प्रतिनिधी । विधानसभेतील माझ्या भाषणावर सरकारकडे एक चकार शब्द नाही. ‘पक्ष तिकीट देओ अथवा न देओ जनता माझ्या पाठीशी’ आहे. दुसऱ्या पक्षातील लोकांना तुम्ही मंत्रीपदे टिकिट देतात. परंतु पक्षाकडून निष्ठावातांचे अहवेलना करतात अश्या अनेक मुद्याना हात घालत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी धुव्वाधार बॅटिंग केली. त्यांच्या या भाषणामुळे कार्यकर्ते पदाधिकारी मात्र सुन्न पडले होते.
याबाबत माहिती अशी की, भाजपाची विस्तृत व चिंतन बैठक रावेर मध्ये आयोजित केली होती. यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे हे आले होते. यावेळी ते पुढे म्हणाले की, माझे मंत्रीपद गेल्या पासुन मी आणलेले अनेक प्रकल्प रखडलेले आहेत. त्यामुळे जिल्हाचे खुप मोठे नुकसान झाले आहे. मी 40 वर्षपुर्वी लावलेले रोपटे मोठे झाले असून, ते मी तोडनार नाही. मी जसा बाजूला झालो आहे. तसे तुम्ही देखील एके दिवशी बाजूला होऊ शकता. मी जनतेत राहणारा नेता असून, जमीनीवर राहूनच काम केले आहे. म्हणून मंत्रीपद गेल्यावर सुध्दा मला काहीच फरक पडला नाही. नुकसान झाले ते माझ्या गरीब जनतेचे अश्या भावुक शब्दात रावेरमध्ये भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले.
यावेळी बैठकीला आ हरीभाऊ जावळे, जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, प्रा. सुनील नेवे, सभापती माधुरी नेमाडे, उपसभापती अनिता चौधरी, जिल्हा परिषद सदस्य नंदाताई पाटील, रंजना पाटील, कैलास सरोदे, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, प.स. सदस्य धनश्री सावळे, कविता कोळी, योगिता वानखेने, हर्षल पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष सुनिल पाटील, भाजपा सरचिटनीस महेश चौधरी, संजय गांधी, निराधारचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, पद्माकर महाजन, शहरध्यक्ष मनोज श्रावग आदी गावांचे सरपंच सदस्य लोक प्रतिनिधी तसेच भाजपा पदाधिकारी उपस्थितीत होते.