नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काल (गुरुवारी) विंग कमांडर अभिनंदन भारतात परतले. त्यामुळे देशात आनंदाचे वातावरण आहे.. परंतु, पाकिस्तामध्ये तिथल्या स्थानिकांनी हिंदुस्थानी पायलट समजून स्वतःच्याच सैनिकाला ठेचून मारल्याची घटना घडली आहे. शाहाजुद्दिन असे या दुर्दैवी पाकिस्तानी सैनिकाचे नाव आहे.
पाकिस्तानी हवाई दलाचे वैमानिक शाहनाज एफ १६ विमानाचे उड्डाण करत होते. भारतीय विमानाने यावेळी एफ १६ विमानाचा वेध घेतला होता. यानंतर शाहनाज यांनी पॅराशूटच्या सहाय्याने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये लँण्डिंग केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, शाहनाज सुखरुप खाली उतरण्याआधीच जखमी झाले होते. त्यांचा गणवेश फाटला होता. यावेळी तेथील लोकांना हा भारतीय वैमानिक असल्याचा गैरसमज झाला आणि त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने शाहनाज यांचा मृत्यू झाला.