Home क्राईम ‘पाकिस्तान जिंदाबाद’ पोस्ट व्हायरल करणाऱ्या शिक्षिकेस अटक

‘पाकिस्तान जिंदाबाद’ पोस्ट व्हायरल करणाऱ्या शिक्षिकेस अटक


बेळगाव (वृत्तसेवा) जिल्ह्यामधील सौंदत्ती तालुक्यातील शिवापूर गावातील एका शिक्षिकेने पाकिस्तान जिंदाबाद असा मजकूर सोशल मीडियावर व्हायरल केल्याने पोलिसांनी त्या शिक्षिकेला अटक केली आहे. दरम्यान,संतप्त जमावाने तिच्या घरावर दगडफेक करत घर पेटविण्याचा प्रयत्न केल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

शिवापूर (ता. सौंदत्ती) येथील झिजायला ममदापुर नामक शिक्षिकेने पाकिस्तान जिंदाबाद असा मजकूर व्हाट्सअँप व्हायरल केला होता. त्यामुळे मुरगोड पोलिसांनी शनिवारी सायंकाळी तिला अटक करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. ही माहिती समजताच संतप्त झालेल्या जमावाने त्या शिक्षिकेच्या घरावर दगडफेक करत घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला. ही माहीती समजताच मुरगोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound