चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ग्रामीण भागातील महिलांना शहरी भागाच्या तुलनेत आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. यासाठी परिसरात हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देवून त्यांच्या अंगभूत दडलेल्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी खान्देशी कलाकारांच्या उपस्थितीत खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
पिलखोड ता.चाळीसगाव येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालयात माजी खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या संकल्पनेतून “सन्मान कर्तुत्वाचा खेळ पैठणीचा” “जागर स्त्री शक्तीचा स्वाभिमानी बहिणींचा” हा मनोरंजनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खान्देशी अहिराणी कलाकार पैसावाली ताई फेम तोंडाय आक्का विद्याताई भाटिया, अमळनेरनी जत्रा तथा घाल कपडा चाल चोपडा फेम शशीभाऊ मोरे, उंबरखेडचे सुपुत्र रिलस्टार तथा जय खान्देश भाऊ जय खान्देश फेम दीपकभाऊ खंडाळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते आई जगदंबेच्या प्रतिमापूजन व मशाल पेटवून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी दीपकभाऊ खंडाळे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत जय खानदेश भाऊ जय खानदेश म्हणत कार्यक्रमात उत्साह भरला. माजी खासदार उन्मेशदादा समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा सदैव प्रयत्न करत असतात. त्यांनी गिरणा खोऱ्याच्या समृद्धीसाठी सलग 28 तास गिरणेच्या प्रवाहात बसून नार पार योजनेसाठी आंदोलन केले. एखादा लोकप्रतिनिधी पाण्यात बसून आंदोलन करतो. याला गिरणा खोऱ्यासह राज्यात मोठा पाठिंबा मिळाला.मी देखील या आंदोलनात सहभागी झालो.आज त्यांच्या माध्यमातून खेळ पैठणीचा हा कार्यक्रम ग्रामीण भागातील महिला भगिनींसाठी होतो आहे याचा मला आनंद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी परिसरातील आत्मनिर्भर , कर्तुत्ववान आणि आदर्श माता,भगिनी यांची यशोगाथा सांगत त्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी उपस्थित माता-भगिनींनी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध भक्ती गीते सादर करून प्रेक्षकांचे वाहवा मिळविली.यावेळी स्पर्धकांनी अध्यात्मिक गिते,उखाणा, फॅन्सी ड्रेस, काव्य, फुगडी, गायन सादर करीत हजारो भगिनींना मंत्रमुग्ध केले. पैठणी साडीच्या प्रथम विजेत्या मनीषा मोरे, द्वितीय बक्षीस तृप्ती महाजन, तृतीय क्रमांक पुनम कच्छवा यांचा संपदा पाटील यांच्या हस्ते मानाची पैठणी भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख मोनाताई मगर पाटील,तालुकाप्रमुख सविताताई कुमावत, शहरप्रमुख कविताताई साळवे, सरपंच पत्नी रवीनाताई यशोद,उपसरपंच रुपालीताई पाटील, ग्रामपंचायत कामगार सेनेच्या महिराज बी,पूनम महाजन, कल्पना मोरे, मायाबाई यशोद, इन्हरव्हील क्लबच्या अध्यक्षा संध्या गुप्ता, ग्रा.सदस्य गोरख बाविस्कर,संदीप मोरे,सुनील पंडित, गोकुळ बाविस्कर, नामदेव महाजन, मा सरपंच प्रकाश यशोद, सोशल मीडिया प्रमुख गणेश महाजन, सचिन बाविस्कर, किशोर माळी, सामाजिक कार्यकर्ते वाल्मीक महाले, स्वप्निल मोरे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगीता निकम यांनी तर आभार राणी कापडणे यांनी व्यक्त केले.पंचक्रोशीतील हजारो महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.