कै. वडीलांच्या उत्तरकार्याचा खर्च दिला शाळा विकासासाठी

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नुकतेच भिलाली गावाचे जेष्ठ नागरिक व निवृत्त मुख्याध्यापक कै भिमराव तोताराम पाटील यांचे वृध्दपकाळाने दुःखद निधन झाले. त्यांचे सुपुत्र राज्य शिक्षक मनवंतराव भिमराव साळुंखे व माध्यमिक शिक्षक गुणवंतराव भिमराव साळुंखे यांनी व्यक्तीच्या मृत्युनंतर त्याबाबत गावातील व समाजातील काही वर्षानुवर्षाच्या जुन्या परंपरा व रितीरिवाज यांना फाटा देवुन काही तरी समाज परिवर्तन करण्याचे ठरवुन ते धाडसही दाखविले. त्यांनी आपल्या कै वडीलांचे दशक्रिया, गंधमुक्ती व उत्तरकार्य हे १० ते १३ दिवस न लांबविता हे सर्व धार्मिक विधी फक्त ५ दिवसात पुर्ण करण्याचा निर्णय घेतला. यामुळे त्यांचा व इतरांचाही वेळ वाचणार आहे. मोठी भाऊबंदकी व गाव जवळ जवळ एक सुतकी असल्याने इतरांनाही त्यांच्याकडचे धार्मिक विधी व इतर कार्य करण्यास मोकळीक मिळणार आहे. तसेच उत्तरकार्याचे भोजन हे संपुर्ण गावाला दिले जाते. त्यावर साधारण १ लाख १० हजाराच्या आसपास खर्च हा निश्चित असतो. एक दिवसासाठी होणारा हा खर्च तसा समाजाचा कोणताही विकास साधत नाही.

कै. भिमराव साळुंखे यांचा संपुर्ण परिवार हा शिक्षक पेशात आहे . शिक्षक हा समाज परिर्वतन करणारा असल्याने त्यांनी यातुन काही तरी नवे परिवर्तन व समाजाचे भले होईल ते करण्याचे ठरविले. विचाराअंती उत्तरकार्यावर होणारा खर्च म्हणजे १ लाख २५ हजार रुपये रोख हे गावाचे ज्ञानमंदिर संत सोमगीर हायस्कुलला भेट देण्याचा धाडसी निर्णय घेतला. शाळेची इमारत सुंदर आहे पण शाळेला शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी किचन शेड नाही . या पैशातुन शाळेत कायम स्वरूपी किचनशेड उभारले जाणार आहे . त्या रकमेचा धनादेश मनोज आत्माराम पाटील , अध्यक्ष श्री स्वामी समर्थ शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ भादली खुर्द ता जळगाव यांच्या मार्फत शाळेचे मुख्याध्यापक अविनाश पाटील , उप मुख्याध्यापक सुरेश पाटील , विकास पाटील यांना या बंधुंनी आज प्रदान केला. अनेकांनी साळुंखे बंधुंनी निर्माण केलेल्या या आदर्शाचे समाजातील अनेक मान्यवरांनी मनापासुन स्वागत केले आहे . हा समाजमन बदलण्याचा शुभ संकेत आहे .

Protected Content