पहूर ता.जामनेर प्रतिनिधी । येथील संतोषीमातानगर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सरपंच नीता पाटील व सरपंच तथा उत्तर महाराष्ट्र विभागाचे संपर्क प्रमुख रामेश्वर पाटील यांनी स्वखर्चाने विद्यार्थांचे शैक्षणिक हित जोपासण्यासाठी शालेय गणवेशापासून वंचित असलेल्या ४७ मुलांना गणवेश तसेच शाळेसाठी लागणारे साहित्य वाटप करण्यात आले आहे.
या कार्यक्रमातच समग्र शिक्षा अभियान अंतर्गत सन २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षासाठी शालेय गणेश लाभार्थी १११ विद्यार्थ्यांना शालेय गणवेश उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पहूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप शिरसाठ हे असून त्यांच्या हस्ते वंचित ४७ विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात शिरसाठ यांनी सांगितले की, बक्षिस किंवा शैक्षणिक साहित्य तसेच गणवेश हे ज्या वेळेस विद्यार्थ्यांना दिले जाते. त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा लाख मोलाचा असतो. स्वखर्चाने गणवेश वाटपाचा व शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम हा खरोखर गौरवास्पद असा उपक्रम होता. यावेळी माजी जि.प.सदस्य राजधर पांढरे, अॅड.एस.आर. पाटील, उत्तर महाराष्ट्र विभागाचे धनगर समाजाचे संपर्क प्रमुख रामेश्वर पाटील, सरपंच नीता पाटील, पहूर कसबे माजी उपसरपंच अशोक सुरवाडे, पहूर ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष मनोज जोशी, मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास उपसरपंच श्याम सावळे, ग्रा.पं.सदस्य शरद पांढरे, रविंद्र मोरे, गयासुद्दीन तडवी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीमती निर्गुणा महाजन, सदस्य बन्सी तायडे, राजेंद्र धुळसंधीर, केंद्रप्रमुख भानुदास तायडे, शेख गनी, सचिन कुमावत, संदिप बेढे, भारत पाटील, गजानन देशमुख, ज्ञानेश्वर पवार, माधव उबाळे, पत्रकार शरद बेलपत्रे, गणेश पांढरे आदि मान्यवर उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी केले तर आभार दिनेश गाडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.