‘पद्मश्री मधूकर ढवळीकर शिष्यवृत्ती योजना’ जाहीर

dhavalikar

मुंबई वृत्तसंस्था । ताम्रपाषाणयुगीन संस्कृतींच्या अभ्यासाबरोबर ऐतिहासिक पुरातत्वीय स्थळांच्या उत्खननाचे मूल्यमापन या क्षेत्रात पद्मश्री मधुकर केशव ढवळीकर यांनी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल ‘पद्मश्री मधूकर ढवळीकर शिष्यवृत्ती योजना’ जाहीर करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, सन २०२० पासून एक वर्ष ज्येष्ठ संशोधकास ¨पद्मश्री सदाशिव गोरक्षकर जीवनगौरव पुरस्कार तर पुढील वर्षी पुरातत्व, संग्रहालय शास्त्र, संवर्धन, मुर्तिविज्ञान आदी विषयांमध्ये डॉक्टरेट करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांस पद्मश्री मधूकर ढवळीकर शिष्यवृत्ती याक्रमाने ही योजना राबविण्यात येईल आणि भारतीय संग्रहालय आणि ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीच्या अभ्यासाच्या क्षेत्रात संशोधन करणारे अभ्यासक, ज्येष्ठ संशोधक व गुणवंत विद्यार्थ्यांना या पुरस्कार व शिष्यवृत्तीच्या निमित्ताने अधिक प्रोत्साहन मिळेल. या पुरस्काराचे स्वरुप मानपत्र, स्मृतीचिन्ह व रोख रक्कम रु. ५ लाख असे आहे. अशी माहिती विनोद तावडे यांनी सांगितले.

Protected Content