यावल प्रतिनिधी | तालुक्यातील पाडळसे येथील घरकूलचे लाभार्थी जागेअभावी योजनांपासून वंचित असल्याने गावठाण विस्ताराच्या जागेचे मोजमाप करून जागा निश्चिती करण्याची मागणी नायब तहसीलदारांना निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
तालुक्यातील पाडळसे गावातील घरकुलच्या अनेक लाभार्थ्यांना आज यावल तहसील जागा नसल्यामुळे आपल्या हक्काच्या घरापासुन वंचीत राहावे लागत असल्याने ग्रामस्थांनी याबाबत तक्रारीचे निवेदन दिले आहे. यात म्हटले आहे की, यावल येथील भूमिअभिलेख कार्यालय येथे पाडळसे येथील पंतप्रधान आवास योजना व इतर घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना जागे अभावी वंचित रहावे लागत आहे.
यावर उपार म्हणून ०४/०४/२०१४ रोजी जिल्हाधिकारी जळगाव यांनी दिलेल्या पाडळसे गट नं ३/१, २७४/१, २७५ व १२३४ या गट नंबर क्षेत्रातील जमिनी पाडळसे गावठाण विस्ताराकडे वर्ग केलेल्या आदेशानुसार सदर जमिनींची मोजमाप करून वर्ग जागा निश्चिती व नकाशा ग्राम पंचायत पाडळसे कडे यांना मिळावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आलेली आहे. यावल तहसीलचे नायब तहसीलदार आर.डी.पाटील यांना हे निवेदन देताना पाडळसे प्रभारी सरपंच खेमचंद कोळी, सदस्य सुभाष भोई , सामाजिक कार्यकर्ते मुकुंदा कोळी व धनराज कोळी उपस्थित होते.