Home धर्म-समाज पाचोर्‍यात युवा सेनेतर्फे पाकिस्तानी ध्वजाचे दहन

पाचोर्‍यात युवा सेनेतर्फे पाकिस्तानी ध्वजाचे दहन

0
62

पाचोरा प्रतिनिधी । पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून येथे युवासेनेतर्फे पाकिस्तानी ध्वजाने दहन करण्यात आले.

पुलवामा मध्ये भारतीय जय जवानांच्या तुकडीवरती पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये आमचे भारतीय जवान शहीद झालेत सारा देश हळहळला आहे. पाचोरा तालुका शिवसेना युवासेनावतीने या भ्याड हल्ल्याच्या तीव्र जाहीर निषेध करण्यात आला. यासाठी पाक निषेधाच्या घोषणा देऊन या देशाच्या ध्वजाचे दहन करण्यात आले. पाकडयाकडून वारंवार होणार्‍या भ्याड हल्ल्याचा एकदा सोक्षमोक्ष लावावे, पाकिस्तानात घुसून बदला घ्या, पाकच्या नापाक इरादा समोर कायमचाच दहशतवाद्यांचा खात्मा करून त्यांना नेस्तनाबूत करा. बैठका विचार विनिमय सल्ला मसलत बंद करा परिणामांची पर्वा कशाला आमच्या देशाच्या सार्वभौमत्वाचा अस्मितेचा गंभीर प्रश्‍न आहे. देश रक्षण हाच खरा राष्ट्रधर्म आहे. राष्ट्र धर्मासाठी प्राणाची बाजी लावूया तरच देश सुखासमाधानाने नांदू शकेल, आता एकच मिशन राबवूया पाकड्या दहशतवादांच्या नायनाट करा, आता गय नाही शहिद जवानांच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा बदला घ्या, आम्ही सारे भारतीय एक जुटीने आपल्या पाठीशी आहोत अशी भावना याप्रसंगी युवा सेनेच्या कार्यर्त्यांनी व्यक्त केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound