Home धर्म-समाज पाचोरा येथे गुरुपौर्णिमानिमित्ताने वृक्षारोपण

पाचोरा येथे गुरुपौर्णिमानिमित्ताने वृक्षारोपण

0
50
pachora vruksharopan
pachora vruksharopan

pachora vruksharopan

पाचोरा प्रतिनिधी । येथील श्री.सु.भा.पाटील प्रा.वि.मंदिरात आज मंगळवार रोजी गुरुपौर्णिमानिमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात ही महर्षी व्यासमुनींच्या प्रतिमेचे पुजनाने झाले. यानंतर विद्यार्थ्यांनी गुरुविषयी आपली मनोगते व्यक्त केली. तसेच जयश्री पाटील यांनी आपल्या मनोगतातून गुरुची महंती व गुरु हे प्रत्येकांच्या जीवनातील महत्त्व स्थान आहे. यावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे सर्व मान्यवरांनी व विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात विविध प्रकारच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दीपक पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक नारायण सोनवणे, संदीप शेवरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चारुशीला पाटील तर आभार राहुल वाघ यांनी मानले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound