पाचोरा प्रतिनिधी । येथील श्री.सु.भा पाटील प्राथमिक विद्यामंदिर शाळेची आषाढीएकादशी निम्मित शहरातून टाळ आणि हरिनामाच्या गजरात दिंडी काढण्यात आली.
या दिंडीचे दर्शन घेण्यासाठी देशमुखवाडी सोनारगल्ली, जामनेर रोड, शिवाजी चौक, विपी रोड भागातील रहिवासी आले. सजवलेली पालखी वारकरीचे रुप धारण केले विद्यार्थी, भजनी मंडळ आणि नववार साडी परिधान केलेल्या चिमुकल्या मुली हे या प्रभातफेरीचे आकर्षण ठरल्या होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.सोनवणे यांच्या हस्ते आरती व पालखी पूजन करण्यात आले. प्रसंगी भजनी मंडळातील शिवाजी ठाकूर, राजाराम नाईक, आकाश पाटील, पंढरीनाथ चिते, बाबुराव चौधरी यांनी वारीत भजन कीर्तन व यावर आधारित गाणी, अभंग सादर केले. भजनी मंडळातील सदस्यचा सत्कार जेष्ठ शिक्षक परदेशी यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी राकेश पाटील, रुपाली पाटील, कविता पाटील, सुरेखा पाटील, मनोज पवार, सीमा भदाणे, अभिजीत महालपुरे, योगेश सोनवणे, आशिष पाटील, चेतन पाटील, महेश लोखंडे व सर्व शिक्षक बंधू-भगिनी यांनी विशेष प्रयत्न केले.