पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील तहसील कार्यालयात ९ ते १० अपंग फिरतांना तहसीलदार कैलास चावडे यांना दिसले. चावडे यांना विचारणा केली असता आम्ही राशनकार्डसाठी आलो आहेत. यावर तहसीलदार यांनी तातडीने पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना बोलवून तासाभरात अपंगांना रेशनकार्ड दिले आहे.
पाचोरा तहसिल कार्यालयात ९ ते १० अपंग व्यक्ती फिरतांना आढळून आल्याने येथील तहसिलदार कैलास चावडे यांचे नजरेस आढळून आल्याने तहसिलदारांनी अपंगांना अचानक विचारणा केली असता अपंगांनी आम्ही रेशनकार्डसाठी अर्ज दाखल केलेले असून त्यासाठी आलो आहोत. यावर तलसिलदार कैलास चावडे यांना त्यांची अवस्था पाहवली गेली नाही. त्यांनी सदर अंपगांना त्यांच्या दालनात बसून तातडीने पूरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलवून यांचे रेशनकार्ड आताचे आताच तयार करून माझेकडे स्वाक्षरीसाठी आणा अशा सुचना दिल्यांनतर पुरवठा विभागाचे अधिकारी उमेश शिर्के, साहेबराव पाटील व सोनवणे यांनी केवळ तासाभरात शब्बीरशाह सुलेमान शाह फकिर, जालमसिंग धनसिंग राजपूत, चांगदेव नामदेव धनगर, नवनित सांडू धनगर, अजयशिंग राजपूत, रमेश पंडित चौधरी, ज्ञानेश्वर धनगर, फतनाबी अमीर, कोमलसिंग राजपूत, कमलबाई राजपूत या ९ लोकांचे रेशनकार्ड तातडीने बनवून त्यांचे ताब्यात दिल्यांनंतर याप्रसंगी अपंग बंधु भगिनींना गहिवरून आले होते.