Home Cities पाचोरा अंशिका पाटील आयटीएस परिक्षेत राज्यातून प्रथम

अंशिका पाटील आयटीएस परिक्षेत राज्यातून प्रथम

0
41

पाचोरा, प्रतिनिधी | तालुक्यातील होळ येथील कु. अंशिका अमोल पाटील ही विद्यार्थीनी आयटीएस परिक्षेत राज्यातून प्रथम आली आहे.

होळ ता. पाचोरा येथील कु. अंशिका अमोल पाटील या चिमुकली ने सन – २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या आय. टी. एस. परिक्षेत २०० पैकी १९६ गुण मिळवून ती राज्यात पहिली आली आहे. कु. अंशिका ही पाचोरा पोलीस स्टेशन कर्मचारी अमोल पाटील यांची कन्या आहे.

तिच्या या उत्तुंग यशात शाळेतील शिक्षक साहेबराव चौधरी व अंशीका तिचे वडील अमोल पाटील व आई यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कु. अंशिका चे सर्वच स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.


Protected Content

Play sound