पाचोरा प्रतिनिधी । शिवसेना-भाजपा व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार विद्यमान आमदार किशोर पाटील यांच्या प्रचारार्थ आज शहरातील महालपूर मंगल कार्यालयात बुथप्रमुख महायुतीचा संयुक्त मेळावा जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन, आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास सुरूवात करण्यात आली.
यावेळी शिवसेना यांनी जाहिर केलेल्या वचननाम्याचे ना. गिरीश महाजन यांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी तालुक्यातील बोरनार, भडगाव, वाडी येथील रायसिंग नाई, जनार्दन पाटील, राष्ट्रवादीचे राजेंद्र अहिरे, इशा तडवी, दिलावर तडवी, इश्वर पाटील आदी गावातील राष्ट्रवादी कार्यकत्यांनी शिवबंधन बांधून शिवसनेत प्रवेश केला.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष डॉ.संजीव पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ.अस्मिताताई पाटील, भाजप जिल्हा सरचिटणिस सदाशिव आबा, एकलव्य संघटनेचे जिल्हाअध्यक्ष सुधाकर वाघ व विधानसभा क्षेत्र संपर्क प्रमुख सुनिल पाटील, गणेश परदेशी, गणेश पाटील, रावसाहेब पाटील, देवरे बापू, पं.स. बन्सीला पाटील, दिपक पाटील, प्रकाश बापू यांच्यासह शाखाप्रमुख, बुथप्रमुख, उपशाखाप्रमुख, शिवसेना व युवासेना पदाधिकारी तथा संलग्नीत संघटनाचे व महायुती पक्षाचे पदाधिकारी, महिला आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.