पाचोरा ग्रामीण रुग्णालयाची दुरावस्था; राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्र्यांकडे तक्रार

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या अनेक वर्षांपासून पाचोरा ग्रामीण रुग्णालयाची होत असलेली दुरावस्था बघता राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) उद्योग विभाग जिल्हाध्यक्ष दिपक भोई यांनी थेट वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची मंत्रालयात भेट घेऊन पाचोरा ग्रामीण रुग्णालयाची दुरावस्था झाली असल्याचे निदर्शनास आणुन दिले. तसेच पाचोरा ग्रामीण रुग्णालयाची दुरुस्ती व्हावी यासंदर्भात ना. हसन मुश्रीफ यांना निवेदन दिले. ना. हसन मुश्रीफ यांनी लवकरच या मागणीचा पाठपुरावा केला जाईल असे आश्वासित केले आहे.

पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयाची दूरव्यवस्था झाली आहे. रुग्णाची गैरसोय होते आहे. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना खाजगी रुग्णालयाची वाट पकडावी लागत आहे. खाजगी रुग्णालयाचा खर्च करणे गोरगरीब रुग्णांना शक्य होत नाही. पाचोरा ग्रामीण रुग्णालयाची दुरुस्ती होऊन सोयी सुविधा उपलब्ध होणे अत्यंत गरजेचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग विभाग प्रदेशाध्यक्ष सुभाष मालपाणी, उद्योग विभाग जिल्हा अध्यक्ष दिपक भोई, उदयोग विभाग अमरावती शहर कार्याध्यक्ष मथुरा सुरजुसे, उद्योग विभाग चोपडा तालुका अध्यक्ष देवेंद्र कोळी यांच्यासमवेत भेट घेतली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व यावर लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखाली मागण्यांचा आवश्यक विचार केला जाईल आणि लवकरात लवकर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करू असे हसन मुश्रीफ यांनी यावेळी उद्योग विभागाचे जिल्हा अध्यक्ष दिपक भोई व त्यांच्या शिष्टमंडळ यांना आश्वासित केले.

<p>Protected Content</p>